Tuesday, 20 September 2016

तुम्ही आहात म्हणुन... #shikshakdin

बाळमुठी लेखणी धरली 
गीतेची भाषा कळली

गणिताचे भरले घाव 
खेळाचा झाला सराव

हिऱ्याला पैलू पडले 
जगण्याशी नाते जडले

पंखान्नी उंच भरारी
घेत कवेत दुनिया सारी

दृष्टीकोन नवे आचरले 
परिसस्पर्शी सोने झाले

रुजवले माणुसपण 
परिस्थितीची आली जाण

भविष्याचा माणुस घडला 
त्यासाठी तुम्ही धडपडला

नतमस्तक चरणी होउ 
द्यान-वारसा पुढेच नेउ


... भावना