Tuesday, 20 September 2016

सोबत

उलगडून दाखवायला पडलेली घडी 
कधी हसवायला काढायला एखादी खोडी
गळणार्या मोत्यांसाठी करायला ओंजळीचा शिंपला 
अशी मिठी जिथे श्वास घ्यावा जिथे अविश्वास संपला
आपली ओळख सांगणारे हवे हे पाणीदार डोळे स्वच्छ 
हवी अशीच सोबत बाकी हे मन नेहमीच निरिच्छ


.... भावना