तो मूक लढा,
मी बघितलाच
नाही
काय होणार होतं
बघून?
तो मूक लढा,
मी धड ऐकलाही
नाही
सांगण्या-सांगण्यात
तफावत असते म्हणून
तो मूक लढा चालूच
होता
फरक पडावा हे
मागणं मागत होता
फरक पडेल हे
विश्वासानं सांगत होता
मी होतो, मी आहे, मी नुसताच असेन
पण तो लढा आज
म्हणाला,
"उद्याहि मी
लढतानाच दिसेन!"
...भावना