घराच्यात्या
कोनाड्यात एक दिवा मिणमिणे
त्यालाही हे नको
वाटे असे तुझ्याविण जिणे
घराच्यात्या
अंगणात एक झुला कुरकुरे
तुझ्या-माझ्या
झोक्याचे ते स्वप्न कसे करू पुरे
घराच्यात्या
छतालाही काळोखाची वाटे भीती
हितगुज झाले नाही
कोण जाणे दिस किती
घराच्यात्या
दारालाहि बघू वाटे वाटसरू
निरोप तो आणेल का
कडी लागे हट्ट करू
घरच्यात्या परसात
एक आंबा हिरमुसे
दूरवर नजरेला
त्याच्याहि ना कोणी दिसे
घराच्या त्या
खोलीतली एक शेज हरवली
दिवसाने रातीलाही
दिवास्वप्ने दाखविली
घराच्यात्या
मधोमध घट्ट उभा खांब म्हणे
थकु नका, शोधू नका आधाराला कोणी येणे
...भावना