Sunday, 3 May 2015

वीज


जशा स्वर्गिच्या वाटती गुप्त वाटा
भासे कधी उसळल्या क्रूर लाटा

 

जणू ईश्वरा क्रोध अत्यंत आहे
कि हि कल्पना अंगणी धावताहे

 

नभी खेळते चपला खेळ हो ती
असावी तिची का कुणालाही भीती

 

मला मोद पाहूनी हा खेळ होतो
जसे वाटते गूढ संकेत येतो


...भावना