तुझ्या कुशीतले,
क्षण खुशीतले, पुन्हा जागले
मला बघून ते,
अती गोड, चिमुकले हासले
अहा! किती सुखे,
तशा सारखे, दिन परतले
पिलास या बिलगुनी,
तुझे ते ऋण मी, जाणले
कशा टुकुटुकु,
अशा बघती त्या, हसुनी सारख्या
जणु पुनर भेटल्या,
पूर्वजन्मीच्या, मज सख्या
अजूनी मज आठवे,
तुझी मऊमऊ, ती उशी
तुझ्याच मांडीवरी,
निजले नेत्र हे, पटदिशी
तिची चतुर योजना,
किती अशी, मला भावली
सदैव ममतेवरी,
असो कृपे, तुझी सावली
तिचे ते देणे,
तिला परतणे, अतिव उत्सुके
अशीच नियती
पुन्हा, वरद देऊ दे, कौतुके
...भावना