माझ्या बोलीतला
बोल
लाल मातीतला पाय
दुज्या बोलीतला
बोल
चटके डांबरी खाय
माझ्या बोलीतला
बोल
अंतरीचा ठोका
डोले
दुज्या बोलीतला
बोल
बुद्धीचीच भाषा
बोले
माझ्या बोलीतला
बोल
भावनेचा शुद्ध
झरा
दुज्या बोलीतला
बोल
वाटे नेहमी अधुरा
माझ्या बोलीतला
बोल
माय माझी गाते
गाणी
दुज्या बोलीतला बोल
निराधार अनवाणी
माझ्या बोलीतला
बोल
हाक तो हि तीच
जाणे
दुज्या बोलीतला
बोल
दुसऱ्याचे
पांघरणे
...भावना