स्वतःच्याच
विचारात स्वतःला गाडून, जेव्हा स्वतःशीच एकदा रडावं म्हटलं
का कळत नाही त्या
प्रत्येक वेळी, पडदा उघडून नवीन नाटक पुढे प्रकटलं
त्यानी दिली होती
आधीच तिसरी घंटा, जराही वेळ न देता
मेक अप लाउनच
असलेल्या मला, त्याची सवयच झाली होती आता
माझाच खरा चेहरा
मला कधी बघता येईल? मलाच नव्हतं कळलं
आणि तेव्हाच कोणी
तरी मगासच्या कामाबद्दल दाद द्यायला वळलं
स्वतःच्याच
विचारात तेव्हा, मी स्वतःला म्हटलं
तुझं स्वतःचं, तुझ्या स्वतःच्या हातून, कधीच निसटलं!!!
...भावना