ऑनलाइन शॉपिंग,
ऑनलाइन गप्पा,
अपडेटेड
रहाण्यासाठी धडपडताहेत सगळेजण
मात्र या बिझी
शेड्युलमध्ये गुदमरला आहे,
एक बिचारा निवांत
क्षण
सोशल ग्रुप्सवर,
जोक्सचा मारा,
आवडो नआवडो,
तुम्ही फॉरवर्ड करा
भूकंप असो नाहीतर
सुनामीचे फोटो,
अश्रुंचे
सिम्बॉलच ढाळणार आपण
अशाच या बिझी
शेड्युलमध्ये गुदमरतो आहे,
तो बिचारा निवांत
क्षण
न्यूज चानल्सचं
वाढतं प्रस्थ,
खऱ्या-खोट्या
बातम्यांपेक्षा माणुसकी स्वस्त
आजच्या हेडलाइननि
पुसले जाताहेत,
कालच्या घटनेचे
व्रण
आणि इथे गुदमरतो
आहे,
तो बिचारा निवांत
क्षण
मार्केटिंग
स्किल्स आणि जाहिराती, विकू शकतं इथे
सगळं
आजच्या
नाविन्यापेक्षा वाटतं, उद्याचंच ट्रेंडी
आणि वेगळं
सुख विकत घ्यायला,
रांगा लाऊन,
नेटानी उभे आपण
पण शेवटी धांदलीत
या हरवला आहे,
तो एक बिचारा
निवांत क्षण