दोन वेळ भरपेट
भात, भाजी, पोळी
पण अनुभवाची
शिदोरी नाही, रिकामीचं आमची
झोळी!
शेतात कुठे,
कसं, कधी, काय उगवतं?
पुस्तकातलं
ज्ञानहि पुस्तकातच रहातं
सूर्योदय न पहातच
झाल्या सगळ्या सकाळी
अनुभवाशिवायच
राहिली रिकामी, आमची झोळी
अंगावर घेतलाच
नाही कधी, मनसोक्त वारा
पहिल्या पावसात
ना कधी जाणवला, सृष्टीचा शहरा
निसर्गाच्या
रंगांची, बघितलीच नाही कधी रांगोळी
अनुभवाशिवायच
राहिली रिकामी, आमची झोळी
लिहिण्यासाठी
वापरलं फक्त डोकं आणि हात
कसं जाणार आम्ही
स्वप्न, कथा आणि
काव्यांच्या राज्यात
शब्दात फक्त
इतकाच बदल, शाई निळी हवी का काळी?
कारण
अनुभवाशिवायच राहिली आहे रिकामी, आमची झोळी
...भावना