काय ग झाले?
सासरी मी आले!
या खोलीचा,
त्या खोलीचा
केर नाही काढला
मी केस पाहिला
सासरी मी आले!
काय ग झाले?
या सणाला,
त्या सणाला
बेत नाही जमला
सुगरण हवी मला
सासरी मी आले!
काय ग झाले?
या वेळची,
त्या वेळची
तूच कर धुणी
नको मोलकरणी
सासरी मी आले!
काय ग झाले?
या घडीला त्या
घडीला
रित नाही तुला
ताप होतो मला
सासरी मी आले!
काय ग झाले?
हा चुकला तो
चुकला
उगा वाद ताणला
गजरा मी आणला
काय ग झाले?
घर माझे झाले!...भावना