Tuesday, 3 March 2015

इतकं मोठ्ठ कोडं!!!


इतकं मोठ्ठ कोडं, एकटी सोडवू कशी?
शेपूट छोट, हत्ती कशी उडवेल माशी?

 
छोट्या किड्यांना पायांचा उपयोग किती?
दिसत नाही काळोख मग, कसली भीती?


कोकीळेलाच का पाळणाघराची हि सोय?
आई नाही शिकवत, कोकीळ गाणं म्हणतोय?


काळी रात्र, चंद्र तरी दिसतो कसा?
उजेडात लपून कुठे रहातो असा?



दोन्ही डोळे पुढे, मागे दिसेल कसं?
गाय गरीब, हवा का शिंगांचा-राक्षस?


लांब मान सावरती, जिराफाची बाळं!?
गोरं पिल्लू डुकरीण, होऊ देते काळं!?



पाण्यामध्ये श्वास कसा घेतो हा मासा!?

माती मध्ये घर तरी गोरा का ससा?

 
रस्ता आपला विसरत नाही नदी कशी?
आई बघून भीते का झुरळाची मिशी???

...भावना