Sunday, 15 March 2015

एक ओला शब्द...


आकाशाची नजर कोरडी
कोरड्या मातीला नाही माया

आश्वासनांच्या कोरड्या यादीवर
नाही तयार आशाहि फुलाया

 
कोरड्या वास्तवाचा विस्तव
दुःखाची कातडीहि निबर कोरडी

कोरड्या घशातून टाहो कसा फुटेल?
मरणाचीहि कोरडीच उडी

 
दोष कुणाला देऊ
कोरड्या हातावर भेगांचच जाळं

एक ओला शब्द मागायला येतोय
तेवढा विश्वास सांभाळ 

...भावना