देवा तुला देते,
मी एक एक्शेंज ऑफर
तू ये खाली,
मला दे तुझं घर
घाबरू नको तू,
माझा मोठा आहे बंगला
चार-सहा नोकरांनी
मेनटेन्ड चांगला
खेळणी आहेत इथे
हवीतेवढी ढीग भर
पण, तू ये खाली, मला दे तुझं घर
न चुकता बाबा
देतील तुला पोकेट मनी
आणि डब्यात
नेहेमी असेल फास्ट-फूड फनी
हवा तर घे माझा
टेडी बेअर
पण, तू ये खाली, मला दे तुझं घर
घर तुझं छोटं,
त्यात माणसं अमाप
म्हणून करत नाहीस,
तू कधी शोऑफ
इथे मात्र
पार्टीत तू छान परफॉर्म कर
तू ये खाली,
मला दे तुझं घर
घरी तुझ्या असेल
कि रे कोणी तरी सख्ख
कुशीत घेईल मला,
माझं तेच आहे दुःख
छोट्या भावाला
मात्र, मी नेणार बरोबर
तू ये खाली,
मला दे तुझं घर
...भावना