गोष्टी लक्षात
ठेवायचा, आम्हीच घेतला आहे का मक्ता?
प्रत्येक गोष्ट
मिळत असते नेहेमी, तुम्हाला न मागता
Advanced Gadgets उशाशी, त्यात पुढच्या पन्नास वर्षांची Calendars
तरीही आपल्याच
डोक्यात ठेवायला लागतात, यांची सगळी Reminders
पहाटे उठण्याचा,
अचानक केला जातो पण
अलार्म बंद
करायचा मात्र असतो, उठून आपण
हे बाहेर पडताना
द्यावी लागते 'टु - डु - लिस्ट',
हातात
तरीही अनेक
गोष्टी, सहज विसरल्या जातात
वर्षभर 'ही डायरी', अशीच असेल हाताशी
पण लग्नाचा आणि
माझा वाढदिवस आठवेल का या तरी वर्षी?
...भावना