तो एक अनामिक
स्पर्श सुखाचा,
अलगद खुणवून गेला
मन होते अजुनी
हिंदोळ्यावर,
गंध फुलांचा आला
निसटून वेळ गेली,
तरी खुण ही
मिळाली
उकले उनाड वारा, हे गूढ भेटीचे
शब्द नसलेले, भाव लपलेले
आकळे आता गीत
भेटीचे
नावेला या
हेलकावे समजलेच नव्हते
कोणती दिशा समोरी
ओढुनी तिज नेते
होऊनी वल्ह हा
क्षण पुढे आला
नजर ही शोधते तोच
किनारा
आता कळे मनाला, संपले ते शोध त्याचे
पुढे एक मात्र
आहे, ते गाव भेटीचे
भरतीच्या लाटे
परी ते क्षण समोरच होते
लाजरीला भावनांना
दडवणेच जमते
रेघ वाळूवरी बोलू
पहाते
गाठ रुमाली ही
काय लपवते
हे मोर
पापण्यांचे, धरती ते ताल त्यांचे
आता पुरे कळाले
संकेत भेटीचे
...भावना