पुष्कळदा
वेंधळेपणानी बरंच खरचटत
आपल्या आत एक
लहान मुल असतं
लहानशा गोष्टीचा
मोठ्ठा बाऊ होतो
जमलेल्या रंगात
बेरंग शिरतो
मांडलेल्या
डावावरच मग नशीब रुसतं
आपल्या आत एक
लहान मुल असतं
कधी एखादा छोटासा
काटा
रुततो शोधताना
अनोळखी वाटा
त्याचंच दुःख मग
दिवसभर दिसतं
आपल्या आत एक
लहान मुल असतं
छोटासा आनंदही
पुरतो त्याला
एखादं पीस हि
खुणावतं मनाला
डोळ्याआड त्याला
धडपडू द्यायचं नसतं
आपलं लहान मुल
आपणच सांभाळायचं असतं
...भावना