Thursday, 5 March 2015

अवखळ झरा...


खळाळतो आहे हा अवखळ झरा 
सांभाळा कुणीतरी कवेमध्ये धरा

 
छोट्या-मोठ्या खडकांची नाही याला चाड
दुड- दुड जाई पुढे, आहे खूप द्वाड

 
जिंकायची जणू त्याला आहे खूप घाई
दऱ्या-खोऱ्या, डोंगर धुंडाळत जाई

 
रानातला लेक तो, रान वेडे पोर
सोपवून माय रानी या हिरवाई घोर

...भावना