Monday, 9 March 2015

कवितेचं वय...


मित्र-मैत्रिणी, सगे-सोयरे,
सगळ्यांनीच जणू केला आहे निश्चय

मनापासून ठरवताहेत सगळे,

माझ्या कवितेचं वय

 
कधी दिवस कधी रात्र
तिचं तर रोजच वेगवेगळं तंत्र

थकून मान्य करावा लागेल शेवटी, त्यांनाही पराजय

पण आता मात्र ठरवताहेत सगळे, माझ्या कवितेचं वय

 
बंधनात अडकवून स्वतःला,
असते ती आनंदात कधी

तर कधी मुक्त छन्दातच,
तिची लागते समाधी

कधी कधी वाटतं आरसा प्रतिबिंब दाखवतोय

तेंव्हा मीच त्याला विचारते, माझं काय चुकतंय?

 
उभ्या आडव्या रेषांमधेच कधी खुश होता येतं
कधी अचूक शोधताना सगळंच अव्यक्त रहातं 

विचारांच्या अमुर्ततेला उगा हे वेसण नकोय
प्रश्न उरतोच, मग का ठरवायचं कवितेचं वय?

 
आपल्या माणसांचा आपलेपणा, जाणवतो तिलाही तो प्रयत्न निरामय
तुमच्याही विचारांना का बंध, तुम्हीच ठरवायचं माझ्या कवितेचं वय

...भावना