समाजात स्थान
आमचं, फक्त गाळलेल्या जागा भरा
कधी करू मनापासून
आम्ही #महिला दिन साजरा?
चित्रपटाला कथा,
वर्तमानपत्राला बातमी
जगण्यात आमच्या
सापडतं नाट्य हुकमी
आमच्या शिवाय
दुसऱ्या विषयावर विनोद तरी करा!
मग करू मनापासून
आम्ही #महिला दिन साजरा
कधी उचलून
कोणीतरी मखरात ठेवतं
कधी साधं आरक्षण
हि डोळ्यात खुपत
माणूस म्हणून
आम्हाला स्वाभिमानानं जगू दे कि जरा
करू द्या ना
मनापासून आम्हाला #महिला दिन साजरा
...भावना