अगणित आहेत तारे
कधी गरम, थंड कधी वारे
शांत नदी, झुळझुळ झरे
तुला इतका वेळ
कसा रे?
प्रत्येकाला पाय
मोजलेस तरी काय?
त्यात इतकी बोटं
हि, त्यांना उद्योग हि दिला!
हा इतका सगळा
खटाटोप पुरा कधी केला रे?
देवळा पुढे रांगा
ऐकता कधी सांगा?
मोठ- मोठ्या
मागण्या त्या, ना चिडता ओरडता!
हे रोजचेच रडणे, तरी न थकता तू उभा रे!
प्रत्येकाला आशा
सुख- दुख्खाची
भाषा
जगण्याचे कारण हि
दिले, दिला मरणाचा धक्का!
हा वेग- वेगळा विचार, तुला सुचतो तरी केव्हा रे? मोठे प्राणी असंख्य
छोट्या-मोठ्या
सगळ्यांना तू न्याय एक दिला!
हे इतके सगळे
प्रेम तू कसा, कुठे शिकला रे?
इतके सगळे रंग
मोजण्यात मी दंग
छान सुंदर
जगण्याचा या, मला माझा हेवा!
तू वेळ काढून भेट
मला, मी तुला मिठी मारणारे!
...भावना