Wednesday, 4 March 2015

अंगणी माझ्या...


थेंबावर बसलेली छोटीशी परी
किरणांना धरून आली माझ्या घरी


वाऱ्यानी हेरला तिचा सुगंध
मातीत खेळले तिचे ते रंग

 
मायेचा ओलावा देऊन गेली
बीजात आशा रुजू लागली

 
स्पर्शाने प्रेमाच्या हरखून गेला      
अंगणी माझ्या बगीचा फुलला 

...भावना