स्वप्न चित्र
दोघांनी एक पाहिले
न कळले हात कधी
कसे गुंफले
क्षण चातक हा
झाला, घेत वेध हासला
घनातून एक सूर
निळा बरसला
शर होऊन सरींनी
ते गूढ भेदले
न कळले हात कधी
कसे गुंफले
नाद खळाळला, मनी मोर नाचला
क्षितिजावर
इंद्रधनू जवळ भासला
हिरवाई आनंदली, फुल लाजले
न कळले हात कधी
कसे गुंफले
...भावना