पुन्हा त्या
सुरावर जुनेच गाणे, जुनेच तराणे
का पुन्हा त्या
जाग्या होती गाडलेल्या गोष्टी?
वेदना का जन्म
घेती शब्दांच्या ओष्टी?
सोडवूनी पुन्हा
पुन्हा गुंततात धागे
वैरी झाले मन,
माझे ऐकेना गाऱ्हाणे
पुन्हा त्या
सुरावर जुनेच गाणे, जुनेच तराणे
विसरेना निरर्थक
मागचे आकार
नवा अर्थ शोधू
पाहे, भाबडा विचार
मध्यानिहि बघू
वाटे स्वप्न चांदण्याचे
वळीवाच्या गेल्या
सरी ना फिरून येणे
पुन्हा त्या
सुरावर जुनेच गाणे, जुनेच तराणे
....भावना