Monday, 2 March 2015

शब्द संपदा न्यारी!!!


मराठी आपली माय भाषा, आहे लई भारी
म्हणायला मराठीत अडतं का मग Thank  You आणि Sorry ?

 
आभार मानायचा का तिला होतो इतका भार?
क्षमा मागूनच तर सगळे प्रोब्लेम्स सुटणार!

तिची चूक नाही, आपलीच जीभ जड खरी
म्हणून, म्हणायला मराठीत अडतं,  Thank  You आणि Sorry !

 
टेबल, पेन, पेपर अनेक शब्द तसे उपरे
मिळतील त्यालाही शोधले तर, पर्याय बरे

मायबोली जगवू, आता करू तयारी
मग जाणवेल, किती तिची शब्द संपदा न्यारी!!!

...भावना