चला आपण खेळूया,
तोच खेळ जुना
लादी वरच्या
भेगांमध्ये,
शोधा चित्रं
पुन्हा
भिंतीवरच्या
डागात,
बघा हसरे चेहेरे
भर उन्हात फिरू,
घेऊ,
आपण गार वारे
कागदाची बोट नेऊ,
आनंदाच्या पार
गोगलगायीचा
पाठलाग,
थरारक असणार
लपवून केलेल्या
गोष्टी सांगू,
मित्र-मैत्रिणींच्या
कानात जोर-जोरात हसू,
येणार नाही लाज
मनात
भटकणाऱ्या पिलाला,
देऊ थोडं पाणी
शब्द आठवले नाहीत
तरी,
म्हणू मोठ्यानी
गाणी
मिळून सगळे खेळू
चला,
आनंदात जाईल वेळ
नियम इतकाच,
सोडून नाही जायचं कोणी खेळ
...भावना