Thursday, 12 March 2015

अशी घडावी कविता!


अशी घडावी एकदातरी हातून अमुच्या कविता
प्रत्येकाने वाचून पहावी निदान जाता-जाता

 
कवितेचे त्या गाणे व्हावे काक पक्षासाठी
सर्पानेही मधु सांडावे फ़ुत्काराच्या पाठी

 
चाल सुचावी कर्कटाला, सरळ, साधी, सोपी
साश्रू नयने नक्र, सारस तल्लीन होऊन झोपी

 
रिपु न उरतील सहा, न असतील दुःख, न भेद, न वाद
अजुनी एकच होईल, तूहि हसुनी देशील दाद

...भावना