Sunday, 8 March 2015

आठवणींचा पसारा...


त्रयस्थपणे बघणाऱ्या आयुष्याकडे काय मागू उसनं
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून बसले आहे मघापासनं

 
गळलेलं प्रत्येक पान योग्य आहे झाडाशीच असणं
सुख- दुःख ज्याचं त्यालाच आवडतं कुरवाळीत बसणं

 
वाटत नाही अस्ताव्यस्त पसरलेले क्षण जोडायचा प्रयत्न करावं
उलट मलाच त्यांच्या सारखं विखरून जगणं हवं


आता आंबा मोहर धरत नाही
पारिजात टिपं गाळतो

दाराशी तुळस अपेक्षेने उभी असते

कोमेजलेला चंद्र उगाचच रेंगाळतो  

परतीची वाट सोबत शोधते आहे, करमत नाही तिला एकट असणं 
तुझ्या आठवणींचा पसारा मांडून बसले आहे मघापासनं

...भावना