फेरे घेतले ७ आणि
नशिबाचे वाजले १२
तेव्हा पासून
शोधतोय या ७/१२ चा उतारा
पोरांचं शिक्षण,
महागाईत वाढ, तरतूद करायची कुणी?
त्यात मध्ये
मध्ये फुरंगटून बायको गाळते डोळ्यातनं पाणी
खरेदी यांची
आपल्या नशिबी फक्त रिकामा खिसा आणि सुस्कारा
तेव्हा पासून
शोधतोय या ७/१२ चा उतारा
प्रत्येक
समारंभाची आता वाढत जाते आहे यादी
सगळेच रंग हिरवे-
पिवळे होते लग्ना आधी
जो भेटला लग्नात,
हसला, आता कळतोय अर्थ खरा
तेव्हा पासून
शोधतोय या ७/१२ चा उतारा
...भावना