Wednesday, 4 March 2015

ती #होळी...


गेली कुठे ती रंगपंचमी आणि कुठे ती #होळी
हल्ली फक्त उजाडतात Black & White सकाळी

 
चेहऱ्याला सुट होत नाहीत आता धुळवडीचे रंग
status  ला शोभेल का ती home - made भांग

पूर्वी सारखी आनंदानी भिजत नाहीत मित्र मंडळी
हल्ली फक्त उजाडतात Black & White सकाळी

 
#होळी मध्ये बोंब, तर होतं शेजाऱ्यांशी वाकडं
झाडच नाहीत तर कुठून येणार सुकलेली लाकडं

फुग्यातुन फक्त फुटते दुष्काळाची किंकाळी
हल्ली फक्त उजाडतात Black & White सकाळी

 
परत एकदा ऐकुया ना ते वसंताचं गाणं
कित्ती छान होतं ते मनमोकळ रहाणं

जुन्या रंगांनी पुन्हा भरू पिचकारीची नळी
सगळ्यांसाठीच मग असेल पौर्णिमा ती #होळी

...भावना