मी शूर
म्हणाले त्याला
मी शूर
म्हणाले त्याला
जयजयकार केला
आणि तो पुस्तकात
राहिला
नाही मी घरी
त्याला आणला
शिवबा इतिहास
बनला ...हो जी, जी जी जी जी जी
शिवबाची झाली
सनावळ
शिवबाची झाली
सनावळ
गेला भूतकाळ
वर्तमानात कुठे
उरला?
हात जिजाउचा काय
शिणला?
शिवबा माये विना
कण्हला...हो जी, जी जी जी जी जी
(शिवाजी जन्मावा,
पण शेजारी
का नको आपल्या घरी?
चला करा तयारी!!!)
बांधूनी तत्वाचा
पाळणा
बांधूनी तत्वाचा
पाळणा
शौर्याचा खेळणा
असा तो बाल शिवा
घडला
त्याचा कोट तिने
विणला
शिवबा घरोघरी
आणला...हो जी, जी जी जी जी जी
शिवबा घरोघरी
आणला...हो जी, जी जी जी जी जी
#जयशिवाजी
...भावना #जयशिवाजी