ओळख झाली असं कधी
म्हणावं?
प्रश्नोत्तरानीच
का ताडून घ्यावं?
योग्य वेळी योग्य
प्रश्न सुचतात तरी कुठे
उत्तरालाहि फुटत
जातात नंतर फाटे
मग मनात दुसऱ्या
कसं डोकवावं?
ओळख झाली असं कधी
म्हणावं?
मनाची डोक्याशी
असते का मैत्री?
देऊ शकतील का
दोघं दोघांची खात्री?
डोळ्यातल्या
तरंगांकडे तरी किती वेळ पहावं?
ओळख झाली असं कधी
म्हणावं?
डोळ्यांना आधीच
इतिहास असतो
निळ्या घाऱ्यावर
विश्वास नसतो
रंगांचं विशेषण
कसं पुसावं?
ओळख झाली असं कधी
म्हणावं?
ओळख आपलीच
आपल्याशी नसते
मन कधी बुद्धीला, तर बुद्धी मनाला कोसते
तेव्हा आपणच
आपल्याशी जमवून कसं घ्यावं?
आणि ओळख विचारली
तर काय सांगावं?
...भावना