Friday, 13 March 2015

फ्री WiFi !!!


होते समोर बागेमध्ये हल्ली खूप गर्दी
पूर्ण family visit देते सगळेच कसे दर्दी?

 
एक पिल्लू माती खातं, एक पिल्लू उघडं 
मम्मी- Dady नी अडवलंय एक एक बाकडं

 
एक पिल्लू करतंय आता फुलांची नासाडी
एक पिल्लू चोखत बसलंय चड्डीची नाडी

 
एक पिल्लू लागलं आता दुसऱ्याला ओरबाडू
एक पिल्लू हुंदके देतंय आलं त्याला रडू

 
मम्मी- Dady माना खाली? मला पडलं कोडं 
मग कळलं त्यांना केलंय FB नी वेडं 

 
आता समजलं गर्दी मागचं नक्की कारण काय 
हे तर चित्र सगळीकडे जिथे असतं फ्री WiFi !!!

...भावना