माझं पुस्तक च उघडून
ठेवलं होतं, विश्वास
होता म्हणून
पण कधी फक्त
काही ओळी
अधोरेखित केल्या गेल्या, फापट-पसारा वाटला म्हणूनकाही कोपरे हि दुमडले गेले, ती पान तरी महत्वाची वाटली यातच मी गर्क
आत्ता वेळ नाही म्हणून उपडच ठेवलं कुणी, वेदनांचा केला हि नाही साधा तर्क
एक दोन पानही हरवली मधे, सगळी बांधणीच खिळखिळी झाली
माझंच पुस्तक म्हणून मीच जुळवणी केली
आता तर पुस्तकंच हरवलंय आणि संदर्भही झाले आहेत धुसर
त्या ओळी, ती पानं जपल्या असतील का कुणीतरी कि पडला असेल त्यांनाही विसर?!
…भावना