Sunday, 22 February 2015

प्रेम मी होतो...


आजचा चंद्र
चांदणे पसरतो

चंद्र मी होतो

 
दूर ती उभी
स्पर्श अनुभवतो

स्वप्न मी होतो


लाभला संग
गंध हि मिसळतो

फुल मी होतो

 
झाकली मुठ
हळू उलगडतो

चेतना होतो

 
ऐकला सूर
साज झनकारतो

गीत मी होतो

 
निसर्ग उभा
संवेदना वेढतो

एक मी होतो
 

हरले तन
तृप्त मन जिंकतो

प्रेम मी होतो
(हायकू)

...भावना