भीती घरात, भीती शिवारात,
तुम्ही कितीही
टाळा
काळोखाच्या
व्यवहारात,
ना वेळेचा उरला
आळा
सुंदर वेळी, छान सकाळी
भीषण होते गोष्ट
कुणी पाहिली, सावली काळी
ना बोले कुणीही
स्पष्ट
कुठे त्या कळ्या, कुस्करलेल्या
तरीही सगळे शांत
कुठे तत्वाच्या, चिंधड्या झाल्या
ना चीड दिसे, ना भ्रांत
आजीचे ते घड्याळ
सांगे, टोले जोर जोरात
विसरले ते बंधन
सगळे, 'सात च्या आत घरात'
...भावना