Sunday, 22 February 2015

चारोळ्या...


*  माझ्या आयुष्यात
  हळूच तुझं येणं

  नव्हता योगायोग
  हेच हरवलेलं हसणं

 


*  चार कोपऱ्यानच्या घरात
  संसाराची घडी

  चार हात बनले
  जन्मांतरीचे सवंगडी

 

* श्वासालाही आता
  एकच लय कळते

  पाउल तर नेहमीच 
  त्या पावलाकडे वळते

 

*  माझी जखम
   तुझ्या डोळ्यात दिसली

  आणि पूर्वीची वेदना
  त्याक्षणीच पुसली

...भावना