मनानी घेतली सहज
भरारी
गावाच्या वाटेकडे,
अंगणाच्या घरी
दारात तुळस दिसली
सकाळी
भोवतीन सडा,
शेजारी रांगोळी
गोठ्यात वासर गाय
ती गोंजारी
गावाच्या वाटेकडे,
अंगणाच्या घरी
आंब्याला मोहर,
जसवन्दि कळी
टपोर मोगर,
नाजूक पाकळी
प्रेमाने विहीर
डोकावे किनारी
गावाच्या वाटेकडे,
अंगणाच्या घरी
कुंपणी बाभुळ,
परसात केळी
हसली बघून खिडकी
या वेळी
झोपाळा बोलावे
कुरकुर करी
गावाच्या वाटेकडे,
अंगणाच्या घरी
...भावना