तुला आठवे ना,
जुनी गोष्ट सारी
तुझे शब्द आता
मला पारखे
नसे पूर्वीचा,
तो सुसंवाद आता
तुझ्या लेखणी,
रात्र-दिन सारखे
तुला आठवे ना...
तुझे विश्व आता,
स्वतःच्याच भोवती
ना जाणले,
मागणे हे मुके
निराधार वाटे,
न दिसे किनारा
तुझे हात,
नुसतेच रे कोरडे
तुला आठवे ना...
असे एकटे,
भार वाटे जिवाचा
जसे असुनी,
ना कुणाला दिसे
परिचित आता,
न उरले जराही
तुझ्या लोचनी जे
मला सापडे
तुला आठवे ना...
तमातून आता पुढे
जात आहे
नसे कौमुदी,
चंद्र हि वावडे
तुला आठवे ना,
जुनी गोष्ट सारी
तुझे शब्द आता
मला पारखे
तुला आठवे ना...
...भावना