एकदा एका दुकानात
लागला होता सेल
टिळकांची पगडी… म्हणाला डिस्काउंट
वर मिळेल
गांधीजींचा
चष्मा हि… मला
तिथे दिसला
एकावर एक फ्री
देणार का?... म्हटलं
तर दुकानदार हसला
घेऊन जा म्हणाला,
पण आहे एक
अट
परत करायचं असेल तर
पैसे घेईन चौपट
मी म्हटलं त्याला, जर इतका
स्वस्त सौदा असेल
तर कोणतीही गोष्ट परत
करायचं, मला कशाला सुचेल?
घरी परतायला हवं, म्हटलं
झाली आहे घाई
धुण्या भांडया साठी येणार
होती बाई
जाता जाता मी,
एक लिटर दुध
घेतलं
घरी आल्यावर कळलं, आजही होतं त्यात पाणी मिसळलं
खोटं बोलून दांडी मारली
बाईंनी चौथ्याहि दिवशी
तडक फोन वरच मी सांगून टाकलं, आता येउच नका तुम्ही मावशी!
दुध परत केलं
रागात जाउन तरातरा
म्हटलं माझे पैसे
दंडा सकट परत
करा
चिंटू नि आजही मस्ती
केली, तरी मी फटका नाही दिला
आणि सगळ्यांच्याच भल्यासाठी
मी सत्याग्रह सुरु केला
भांडी घासून, पुसून लादी...
दुखायला लागली कंबर
चिंटू मस्तीच करत होता...मला चहाही
घेता आला नाही
घोटभर
सगळे, आहे त्यातच
खुश होते... माझ्याच
पुरता होता सत्याग्रह
मावशींची शेजारी पगारवाढ, वर त्यांना
तिथे चहाचा हि आग्रह
परत केली पगडी,
चष्मा …ते सांभाळायला
हवी हिम्मत
कोणास ठाऊक कधी
कळणार त्यांची खरी
किंमत
एक लिटर दुध
घेऊन आले परत घरी
मावशींना हि मीच
स्वतःहून जाउन म्हटलं
सॉरी
चिंटूच्या हि पाठीत
बसला एक धपाटा
सणसणीत
पाढे पाठ म्हणू
लागला मग आवाजात खणखणीत
चहा पीता-पीता
पेपरात जाहिरात दिसली
सरोजिनी देवींची साडी....नको
म्हटलं महाग आहे जरी फुकटात
असली
...भावना