पाठीवर दप्तर, कानाशी आई
कंटिन्यूअस
असेसमेंट ची धमकी
देतात बाई
math च्याच टेस्ट आधी
स्पोर्ट्स डे ठेवतात
मलाच का नाही?...
बाबांनाही कॅजुअल
लिव असतात.
प्रोजेक्टस
चा अंगावर भडीमार
स्टार्ट
मॉडेल च्या बाजूला
हवे दोन चार्ट
दिवाळीचे दिवस मजा
करण्यासाठी नसतात?
मलाच का नाही?....
बाबांनाही कॅजुअल
लिव असतात.
CBSE ... ICSE ची
लढाई होते
आई उगाच माझ्या
SSE वर चिडते
सहावीतच तिला दहावीचे
प्रश्न दिसतात
मलाच का नाही?....
बाबांनाही कॅजुअल
लिव असतात
अभ्यासा बरोबर activity ची सक्ती
तिथे हि चालत
नाही एकही युक्ती
आई ला धोनी-
सचिन माझ्यात दिसतात
मलाच का नाही?....
बाबांनाही कॅजुअल
लिव असतात
कधी वाटतं पुरे झाली
सारखी स्पर्धा
दिवस भरच्या धावा-धावीत होतो
जीव अर्धा
सांगा ना हो,
आई- बाबा लहानपण
का विसरतात?
मलाच का नाही?....
बाबांनाही कॅजुअल
लिव असतात
...भावना