प्रत्येकाकडे
त्याचं असं वेगळं
लेणं
ज्याच्या त्याच्या हातात आहे,
आपापलं रूप फुलवणं
कुणाचा स्पर्श प्रेमळ
कुणाची सोबत निर्मळ
कुणाचं सुंदर दिसणं
कुणाचं खळाळून हसणं
कुणाला भक्तीचा ध्यास
कुणाचा गोड प्रत्येक
घास
कुणाची आपुलकीची भेट
कुणाचा संवाद मनाशी थेट
कुणाकडे मंजुळ गाणं
कुणाचं छंदाला जीवापाड जपणं
कुणालाच जमतं जसं
दुसऱ्याला खरीखुरी दाद देणं
तसंच सुचतं कवितेला माझ्या
कानात गुणगुणणं
...भावना