तिला व्यवहारी जगाची कीव
तिला भविष्याची जाणीव
तिचा प्रत्येकावर जीव
तिच्याकडे मायेची कधीच नव्हती
उणीव
कधी हि तिच्या
कुशीत शिरायची सवलत
होती
माझी आजी नेहेमी
माझ्याजवळ होती
तिला लागली असेल का
चाहूल?
तिचं गुंतलं होतं कशात
पाउल?
तिला त्यावेळी माझ्या असण्याची
गरज का होती?
माझी आजी त्यानंतरही
नेहेमी माझ्याजवळच होती
तिला मिळालं असेल का
सुख?
तशी तिची फारच
कमी होती भूक
आजही माझ्याकडे तिच्या आठवणींची
गोधडी आहे
माझी आजी आत्ताही
माझ्याजवळच आहे ...भावना