Wednesday, 18 February 2015

WhatsApp पेक्षा मोठ्ठी गोष्ट…


WhatsApp  वरच्या माझ्या, दोन ग्रुप्स ची गोष्ट
एकात साधी बहिण होती, तर एकात नणंद शिष्ठ

 
होतं माझं सोशल नेटवर्क, तसं एकदम छान
चौवीस तास असायचे मी, WhatsApp  वर ऑन

 
कविता करणे, हि माझी आणखी एक आवड
ग्रुप्स वर पाठवायचे मी, त्या धडाधड

 
नणंद त्या कवितेकडे, पहातही नव्हती कधीच
बहिणीचे मात्र स्माईलीज यायचे, अपलोड होण्याआधीच

 
बहिणीचा तो उत्साह बघून, उर भरून यायचं
कौतुक नेहेमी आपलं, आपल्या माणसाकडूनच व्हायचं

 
संध्याकाळी एकदा मी, सहज बाहेर गेले
हाक मारली नणंदे ने, तिने मला पाहिले

 
घेऊन गेली घरी तिच्या, आग्रह करून मला
मी म्हटलं अचानक, काय झालंय हिला?
 
छोटी सानू घरी तिच्या, छान कविता म्हणते
मामी म्हणते  मला तुझी, कविता पाठ येते
 
वाहिनी  तुझ्या कवितांची, मी केली आहे वही
दादा ला ती देईन गिफ्ट, कर खाली सही
 
भाराऊन मी गेले बघून, खूप खूप ते प्रेम
जाणवलं हे, जेव्हा सोडून आले नेहेमीची फ्रेम
 
कळलं मला जग आहे, WhatsApp पेक्षा मोठ्ठ
इथे आहेत खरे स्माईलीज, नको हसू खोटं
 
ग्रुप वरच्या कवितेचा, अजूनही मला छन्द
एकात साधी बहिण आहे, तर एकात लाडकी नणंद
...भावना