प्रेमळ माती,
निर्मळ पाणी
मोकळे अंगण फुलून
ये
घरच्या फुलाला
ऊनाची झळ वेळेच्या आधी लागू नये
उनाड वारा,
घिसाड पाऊस
डोकावे कधी शोधून
संधी
पुरे अळ्याची
लक्ष्मणरेषा, कुंपण काटेरी होऊ
नये
घरच्या फुलाला...
कोमल कळी,
वळणी पाकळी
वेगळेपण शोभते हे
देवाच्या घराचे,
थोराच्या मानाचे
भाग्य तयाला
लाभते हे
विनयाचा त्याच्या
अव्हेर, कधी अशक्त मानून करू नये
घरच्या फुलाला
ऊनाची झळ वेळेच्या आधी लागू नये
...भावना