टार्गेट च्या डोंगरा
खाली स्वप्नांची माती
तरी अपेक्षांचा प्रश्न म्हणतो
तुझा पगार किती
?
दिसू गोड गोड
आणि हसू छान
छान
प्रत्येका पुढे झुकते
तरी हिला म्हणतात
मान
कामाचा ढिगारा आणि तोकडा वेळ
तरी प्रेझेन्टेशनची
हवी मात्र मसालेदार भेळ
अप्प्रेझल च्या वेळी
सगळा घाम गाळा
बोनस च्या दिवशी
मात्र बॉस नामानिराळा
सेल्फ अक्च्युअलायझेशन च्या टोकाशी
पोहोचायचं लक्ष्य
पण फिसिओलोजिकल नीड मधेच
संपलं आयुष्य
...भावना