तुम्ही ग्रील धुवायला
घेतलंत
आमची फुकट गेली वाळवणं
झाली परत सुरु आता
दोन मजल्यातली भांडणं
लिफ्टच्या मेंटेनन्सचा
भुर्दंड
आम्हाला का पडावा
त्याचा खर्च वरची हवा
खाणाऱ्यानीच करावा
तळाला घर म्हणून
यांचं मागच्याहि बाजूला
दार
अनअथोराईज्ड म्हणून
आम्ही काम्प्लेंड करणार
मुलं टाकतात वरून बॉल
बायको टाकते कचरा खाली माणसंच रहातात बरं
त्यांनाहि विचारात धरा
आता तर खालच्यांनी
थाटलं आहे दुकान
बायको तुमचीच तर खालून
नेते
उधारीवर वाणसामान
भडा भडा बोलून टाकून
मोकळी होतात हि मनं
म्हणून तर असायलाच
हवीत
दोन मजल्यातली भांडणं
...भावना