Wednesday, 4 February 2015

सासूआई...

जबरदस्ती किव्वा कोणतंही tactic नसतं
सासूबाई मला तुम्हालाही आई म्हणायला आवडतं
 
पोळीच्या आकाराचं नका टेन्शन घेऊ
पिठलं झालंय कच्चं तरी मिळून जेऊ

छोट्या छोट्या तक्रारींनी आपल्यातलं अंतर वाढतं
सासूबाई मला तुम्हालाही आई म्हणायला आवडतं
 
नसेल आपल्या दोघींमध्ये मैत्री घट्ट
आई तरी कुठे माझा पुरवते प्रत्येक हट्ट

joint  family असूनही मला एकट वाटतं
सासूबाई मला तुम्हालाही आई म्हणायला आवडतं
 
मी लहान आहे, तुम्ही व्हा मोठ्या
गुन्हा नाही केला, चुका आहेत या छोट्या 

संधी दिली नाहीत तर तिसऱ्याचंच फावतं
सासूबाई मला तुम्हालाही आई म्हणायला आवडतं
 
दोनाचे होतील तीन त्याचे तुम्हाला आहेत वेध
मुलगी आणि मुलगा यात नाही करणार भेद

भीती मला ‘पुढे सुनेची-आई होणं’ कसं झेपतं
सासूबाई मला तुम्हालाही आई म्हणायला आवडतं

...भावना