Sunday, 1 February 2015

Toy Basket


अचानक S5 दचकून उठला
कारण S6  त्याला स्वप्नात दिसला

 
बघतो तर काय, तो उभा होता तिथे
'घाबरू नकोस' म्हणाला, 'मी नवीन आहे इथे'


S6 पुढे बोलायची होत नव्हती हिम्मत
पण धडकी त्याला भरली आता होईल कमी किंमत


'माझ्याकडे टोर्च आहे!'.......हा ओरडला कोण?
नोकिया १२००........पिंटू बंद करेल त्याचं तोंड!

 
'अगं आई !!!' ......हि किंकाळी कुणाची?
पिंटू नि आपटलं......आता वाट त्या स्लिम बॉडी ची

 
आयुष्यच आपलं थोडं....... काय सांगू मी तुला!!
या Toy Basket  ला आता पिंटू हि विटला!!!!


...भावना