स्वतःच्याच
छताखाली देऊ संसार
वाढू
मी म्हटलं घरासाठी थोडं
लोन काढू
सत्राशेसाठ
ऑफर्स आणि सत्राशेसाठ
बँका
फोरम्स भरताना होतात माझ्या
उगाचच चुकाई एम आय च्या भुताची स्वप्न लागली पडू
मी म्हटलं घरासाठी थोडं लोन काढू
बंद रोजची भजी आणि
बंद रोजची भेळ
पाणी पिउन भरू
आता पोट एक
वेळ
विचारातच वाटतोय पझेशन चे
लाडू
मी म्हटलं घरासाठी थोडं
लोन काढू
इनटीरिअर चेंजेस ची, टुम
आली कुठून
पार्किंग लॉट साठी
अलोट लुटून
ट्वेंटी पर्सेंट जमावण्यात च
आलं रडू
मी म्हटलं घरासाठी थोडं
लोन काढू
फ्लेक्झिबल
असूनही अडून बसला
रेट
महिन्याला तोकडं पडतंय बजेट
बँकेकडे छत कसा
देऊ संसार वाढू
मी म्हटलं घरासाठी थोडं
लोन काढू...भावना